नांद्रे / प्रतिनिधी:
नांद्रे प्राथमिक आरोग्य केंन्द्रातील उपलब्ध लसीचा साठा संपल्याने गुरूवारपासून लसीकरण थांबले. लस घेण्यासाठी केन्द्रावर आलेल्या नागरिकांना परत जावे लागत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
नांद्रे गावात एकूण 12 कोरोना रूग्णांची नोंद असून, 3 रूग्ण बरे झाले आहेत तर 1 रूग्ण मयत झाला आहे आणि 8 रूग्ण औषधोपचार घेत आहेत. रूग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने लस घेण्यासाठी लोक पुढे येत आहेत परंतु लस शिल्लक नसल्याने नागरिकांच्यात घबराट वाढली आहे.
‘ब्रेक द चेन’ ही शासकीय संकल्पना येथे प्रभावीपणे राबिवणे महत्वाचे असताना स्थानिक प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. मिनी लाँकडाऊनला नांद्र्यातून अल्प प्रतिसाद मिळत असून व्यावसायिक दुकान बंद करून साहित्याची छुपी विक्रि करत असल्याने मिनी लाँकडाऊन असून नसल्यासारखाच आहे. स्थानिक प्रशासनातील लोकप्रतिनिधी, अधिकारी, पदाधिकारी यांचे कोरोनाबाबत योगदानात दुर्लक्ष होत आहे.
कोरोनाबाबत कडक निर्बंध करणे गरजेचे आहे. वेळप्रसंगी पोलीस प्रशासनाची मदत घेऊन, दंडात्मक कारवाई करून नियमांची कडक अंमलबजावणी करून कोरोना ची साखळी तोडली पाहिजे अन्यथाविपरित परिणाम भोगावे लागतील अशी परिस्थिती नांद्रेत आहे.








