नांद्रे ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला
प्रतिनिधी / सांगली
नांद्रे. ता.मिरज. येथील अमोल सुरेश कोळी हा तरूण जन्मताच दिव्यांग आहे. पंरतु नशिबी आलेले दिव्यांगावर मात करत अमोलने शिक्षण, दैनंदिन कामकाज तसेच अनेक कौशल्य आत्मसात केली आहेत. घरची परिस्थिती हालाक्याची, वडिलाचे छञ हरपलेले, दिव्यांग आदि संकटावर मात करत क्रिक्रेट क्षेञात त्यांनी दाखवलेली चमक दाखविली आहे.
दिव्यांग महाराष्ट्र क्रिक्रेट संघात त्याची निवड करण्यात आली. अमोल कोळी या दिव्यांग तरूणाची दिव्यांग महाराष्ट्र क्रिक्रेटमध्ये निवड झाल्याने नांद्रे ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच डॉ. दिपाली नांद्रेकर, उपसरपंच सुहास पाटील, ग्रामविस्तार अधिकारी संपत माळी, ग्रा.प.सदस्य नेमगोंडा पाटील व सर्व सदस्याच्या वतीने अमोलला क्रिक्रेट साहित्य देऊन सन्मानित करण्यात आले.








