ऑनलाईन टीम / नांदेड :
नांदेडच्या बिलोली तालुक्यातील शाळेत चार शिक्षकांनी सहावीत शिकणाऱया विद्यार्थीवर सामुहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. गुरू-शिष्याच्या नात्याला काळीमा फासणाऱया या घटनेने परिसरात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. पीडित मुलीची प्रकृती सध्या गंभीर असून, ती मृत्यूशी झूंज देत आहे.
सय्यद रसुल, दयानंद राजुरे, प्रदीप पाटील, घनंजय शेळके आणि त्यांना मदत करणाऱया महिला कर्मचारी सुरेखा बनसोडे यांच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारानंतर हे पाचही संशयित आरोपी फरार झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बिलोली तालुक्यातील साईबाबा विद्यालयात पीडित मुलगी सहावीच्या वर्गात शिकते. शाळेतील चार शिक्षकांनी तीला आश्लिल व्हिडिओ दाखवत तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. या प्रकारात शाळेतील महिला कर्मचारी सुरेखा बनसोडे यांनी या शिक्षकांना मदत केली.
घटनेनंतर मुलीने संबंधित प्रकार पालकांना सांगितला. त्यानंतर पीडितेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी रामतीर्थ पोलीस ठाण्यात चार शिक्षकांविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर महिला कर्मचारी सुरेखा बनसोडे हिच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









