प्रतिनिधी / शिरोळ
शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील 62 वर्षाच्या वृद्धाने विष पिऊन आत्महत्या केली. बजरंग लक्ष्मण डंके असे वृद्धाचे नाव आहे.
याबाबत शिरूर पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, नांदणी येथील बजरंग लक्ष्मण डंके यांनी 20 जानेवारी रोजी राहत्या घरी विष पिले होते. त्यानंतर त्यांना उपचाराकरता सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.
याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत








