वार्ताहर / नांदणी
येथील 75 वर्षे वयाच्या वृद्धाचा गुरुवारी कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्याचा शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला. त्यामुळे गावात खळबळ माजली आहे. त्याच्यावर आज सायंकाळी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान आज तालुक्याचे आमदार आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी भेट दिली.
येथील वृद्धाला बुधवारी मिरज येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचा गुरुवारी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्याचा शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला. त्याचा मृतदेह नांदणी येथे आणून त्याच्या मृतदेहाचे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आले होते.
आज मृत व्यक्तीच्या कुटुंबियातील व्यक्ती आणि येथील संबंधित दवाखान्यातील डॉक्टर व इतरांचे स्वाब तपासणीसाठी नमुने घेण्यात आले. त्याची रिपोर्ट उद्या येण्याची शक्यता आहे. दरम्यान आज सकाळी तालुक्याचे आमदार व आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी भेट दिली. यावेळी आरोग्य विभागाचे पदाधिकारी, ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थांची बैठक घेऊन योग्य त्या सूचना दिल्या. तसेच त्यांनी मयत व्यक्तीच्या घराजवळील प्रतिबंधित भेट देऊन पाहणी केली.








