प्रतिनिधी / गोडोली
रात्रीच्या सुमारास भरधाव असलेली पजेरो विद्युत पोलवर जाऊन धडकली. नशेत तर्र असलेल्या या बड्या धेंड्याने दिलेली जोरदार धडकेत वीज पोल पडला आणि तारा तुटल्याने गोडोली पुर्व भागात विद्युत पुरवठा बंद पडला. यामुळे नागरिकांना प्रचंड उकाड्यात रात्र घालवावी लागली. संबंधिताचा रात्री उशिरा महावितरणच्या कर्मचाऱ्यांना सुगावा लागला. त्याने तब्बल २७ हजारच्या दरम्यान झालेल्या नुकसानभरपाई देण्याची तयारी दाखवल्याने महावितरणच्या अधिकाऱ्यांनी प्रकरणावर पडदा टाकला आहे.
रात्री उशिरा नातेवाईकांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी केक आणण्यासाठी बाहेर पडलेल्या गोडोलीतील शाहुनगर परिसरातील एका बड्याची पजेरो गाडी विद्युत पोलला धडकली. यातून संबंधित व्यक्ती नशेत तर्र असताना वाहन चालवत होती. तर घरात वाढदिवस असून त्यासाठी केक आणण्यासाठी बाहेर पडल्याचे घटनास्थळी जमलेल्या नागरिकांना सांगितले.
नुकसान भरपाई भरली तर गुन्हा नाही
महावितरणच्या पोलला धडक देणाऱ्या संबंधितांनी झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे गुन्हा दाखल केला जात नाही. तर संबंधितावर गुन्हा दाखल झाला तर लॉकडाऊनमध्ये दारू आणि वाढदिवसाचा केक कुठून उपलब्ध झाला हे उघड होईल. प्रकरण मिटवण्यासाठी काही बड्यांची फोनाफोनी झाल्याने प्रकरण रफादफा केले गेले आहे.
Previous Article‘कोविड’ नियंत्रणासाठी ‘त्रिस्तरीय व्यवस्थापन ’
Next Article आज राज्यात १८७ नवीन रुग्णा; एकूण रुग्णसंख्या १७६१








