ऑनलाईन टीम / लंडन :
ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने थैमान घातले आहे. मागील 24 तासात या देशात 60 हजार 196 नवे बाधित आढळून आले असून, आजवरची एका दिवसातील ही सर्वाधिक रुग्णवाढ आहे.
मागील काही दिवसांपूर्वी ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आला. हा स्ट्रेन फारसा घातक नसला तरी देखील त्याचा प्रसार वेगाने होत आहे. ब्रिटनमध्ये मागच्या आठवड्याच्या तुलनेत चालू आठवड्यात 30 टक्के अधिक रुग्णांची भर पडली.
दरम्यान, ब्रिटनमधील 60 टक्के नागरिककोरोनाच्या नव्या विषाणूच्या संपर्कात आले आहेत. नवीन विषाणुमुळे मृत्यूचे प्रमाण 20 टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून या देशात पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले आहे. तर 13 लाख लोकांना फायझर-बायोएनटेक तसेच ऑक्सफर्ड ॲस्ट्राजेनेकाची लस दिली गेली आहे.