ऑनलाईन टीम / पॅरिस :
ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या स्ट्रेनचा फ्रान्समध्ये पहिला कोरोना रुग्ण आढळला आहे. फ्रान्सच्या आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एका वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.
फ्रेंचच्या ट्युरस शहरात कोरोनाच्या या नवीन स्ट्रेनने संक्रमित रुग्ण सापडला आहे. तो ब्रिटनहून 19 डिसेंबरला परतला होता. या रुग्णामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. 21 डिसेंबरला त्याची वैद्यकीय तपासणी केली असता, त्याला कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लागण झाल्याचे समोर आले. या रुग्णाला त्याच्याच घरात होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, कोरोनाचा नवा स्ट्रेन पहिल्यांदा ब्रिटनमध्ये आढळल्याने ब्रिटनमधील वाहतुकीवर 50 हून अधिक देशांनी निर्बंध आणले आहेत.









