भारतीय वैज्ञानिकांनी नोवेल कोरोना विषाणूच्या प्रोटीनला लक्ष्य करणाऱया तसेच संक्रमणाच्या उपचारात प्रभावीपणे मदत करू शकणाऱया औषधांचा आणि संभाव्य मिश्रणांची ओळख पटविली आहे.
‘ड्रगबँक’ आकडेवारीच्या अध्ययनावर ‘सायंटिफिक रिपोर्ट्स’ या नियतकालिकात प्रकाशित लेखात यासंबंधी माहिती देण्यात आली आहे. सार्स-कोव-2 वर हल्ला करणाऱया नव्या पद्धतींची ओळख पटविण्यात आल्याचे यात म्हटले गेले आहे. तामिळनाडूच्या अलगप्पा विद्यापीठ आणि स्वीडनच्या केटीएच रॉयल इन्स्टीटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या संशोधकांनी संक्रमणाच्या उपचाराच्या दृष्टीकोनातून औषधे आणि मिश्रणाची यादी सादर केली आहे.
या नव्या संशोधनामुळे विषाणूच्या उत्परिवर्तनावर केंद्रीत काम करण्यास मदत मिळणार आहे. विषाणू वेगाने उत्परिवर्तित होत आहे, म्हणजेच तो स्वतःच्या प्रोटीनमध्ये बदल करत आहे. अनेक प्रोटीन्सला लक्ष्य करणारे औषध असणे याकरता आवश्यक असल्याचे उद्गार अध्ययनात सामील वैभव श्रीवास्तव आणि अरुल मुरुगन यांनी काढले आहेत.









