बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात म्हैसूर आणि बेंगळूरमध्ये गुरुवारपर्यंत डेल्टा प्लस व्हेरिएंटचे ५ रुग्ण होते. दरम्यान, डेल्टा प्लस व्हेरिएंट आणि कोरोना विषाणूच्या परिवर्तित रूपांमुळे कोरोना संसर्गाच्या नव्या लहरी उद्भवू शकतात या चिंतेच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने सहा नवीन जीनोमिक सिक्वेंसींग प्रयोगशाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान विषाणूविषयी तज्ज्ञांनी भीती दूर करण्याचा प्रयत्न केला आहे, हा विषाणू जास्त प्राणघातक नाही, असे म्हंटले आहे.
दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी आम्ही जीनोमिक सिक्वेंसींगसाठी राज्यात सहा प्रयोगशाळेची स्थापना करीत असल्याची माहिती दिली. या प्रयोगशाळा बेंगळूर, म्हैसूर, मंगळूर, हुबळी, विजापूर शिवमोगा येथे असणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.