तज्ञ म्हणतात, सातत्याने गुणधर्म बदलणाऱया कोरोनावर लसीचा प्रभाव कसा पडेल?
- ‘युके’ची लस प्रभावी, तर तिथे लॉकडाऊनचा आधार का घ्यावा लागला?
- ‘क्युअरकोव्हिटा’ प्रभावी ठरूनही शासनाचे दुर्लक्ष का?
- सध्याच्या प्रचलित ऍलोपॅथिक औषधांचे साईड इफेक्ट अधिक
- स्वाईनफ्ल्यू, बर्ड फ्लू, हेपीटायटीस ‘सी’ आजारांवरही ‘क्युअरकोव्हिटा’ गुणकारी
- साईड इफेक्टही शून्य
शेखर सामंत / सिंधुदुर्ग:
एकीकडे कोविडवरील लस जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी शासकीय यंत्रणेने जोरदार तयारी सुरू केली असतानाच, दुसरीकडे वारंवार आपले गुणधर्म बदलणाऱया या व्हायरसवर ही लस कितपत प्रभावी ठरेल, या बाबत दस्तुरखुद्द तज्ञांमधूनच शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या आहेत. केंब्रिजमध्ये विकसित करण्यात आलेली ही लस खरोखरच भारतासाठी वरदान ठरेल, असा दावा केला जात असेल, तर कोरोनाच्या दुसऱया लाटेत स्वत:पाशी ही लस उपलब्ध असतानाही इंग्लंडला स्वत:ला पुन्हा लॉकडाऊनमध्ये का अडकवून घ्यावे लागले? याबाबत तज्ञ मंडळी जाहीरपणे का बोलत नाहीत, असा प्रश्नही विचारला जाऊ लागला आहे.
विविध व्हायरसवर संशोधनाचे काम करणारे प्रसिद्ध वैद्यकीय संशोधक डॉ. योगेश दौंड म्हणतात, गेल्या वर्षभरात या न्यू कोरोना व्हायरसमध्ये अनेकवेळा बदल घडून आले आहेत. माणसाच्या शरीरात जसा डीएनए असतो, तसा व्हायरसच्या शरीरात आर. एन. ए. असतो. म्हणजेच व्हायरसला एकप्रकारे मेंदू असतो. त्याला बुद्धी असते. या बुद्धीच्या बळावर तो स्वत:चा बचावही करीत असतो. या बुद्धीच्या बळावर तो आपले डिफेन्स मॅकेनिझम बनवतो. मानवी शरीरावरील आपली पकड सैल पडू नये म्हणून तो आपल्या स्पाईक म्हणजेच बाहेरील काटय़ांमधील प्रोटीन्समध्ये वारंवार बदल करतो. या न्यू कोरोना व्हायरसने असा प्रकार वारंवार केला आहे. त्यामुळे त्याची मानवी शरीरातील सेलवरील पकड अधिकच घट्ट होत चालली आहे. यापूर्वी ही पकड सैल होती. आता पुढच्या टप्प्यात या व्हायरसच्या प्रादुर्भावाचा वेग वाढण्याची आणि त्याचा परिणाम तात्काळ आणि प्रभावीपणे जाणवण्याची दाट शक्यता असल्याचे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, भारतात देण्यात येणारी नवी लस ही या विषाणूच्या स्पाईक प्रोटीन्सवर काम करणारी आहे. जर या स्पाईक प्रोटीन्समध्येच हा कोरोना वारंवार बदल करीत असेल, तर ही लस यावर कितपत प्रभावी ठरू शकेल? जगातील कुठलाही तज्ञ ही लस शंभर टक्के प्रभावी ठरेल, असे सांगूच शकणार नाही. आपलं डिफेन्स मॅकेनिझम वापरून या कोरोना लसीला निश्चितपणे चकवा देऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
क्युअरकोव्हिटाचा कोरोनाच्या मुळावरच घाव
डॉ. दौड यांना त्यांनी विकसित पेलेल्या ‘क्युअरकोव्हिटा’या औषधी टॅबलेटबाबत छेडले असता ते म्हणाले, ‘क्युअरकोव्हिटा’ हे कोरोनाच्या ‘स्पाईक प्रोटीन्स’ म्हणजेच कोरोनाच्या बाहय़ आवरणावरील काटय़ांमधील प्रोटीन्सवर काम करीत नाही. ‘क्युअरकोव्हिटा’ हे कोरोनाच्या मुळावर म्हणजेच कोरोनाच्या वाढीला प्रामुख्याने जबाबदार असलेल्या त्याच्या आंतरभागातील प्रोटीन्सवर ऍटॅक करतं आणि या व्हायरसची वाढच खुंटवून टाकतं. त्यामुळे या व्हायरसच्या मज्जावाला प्रभावीपणे आळा बसतो. त्यामुळे या क्युअरकोव्हिटाचा इफेक्ट अधिक पटीने अधिक आहे, असे ते म्हणाले. हे औषध प्रोप्रायटरी औषध आहे, ते न्यूट्रॉसुटीकल वर्गात मोडत असून त्याला ‘फुड सेफ्टी स्टँडर्ड ऍथॉरिटी ऍण्ड न्यूट्रॉसुटीकल’ ची मान्यता आहे. यामध्ये हळद हा प्रमुख नैसर्गिक घटक आहे.
विविध वैज्ञानिक चाचण्यांमध्येही यश आपल्या या दाव्याला पुष्टी देताना ते पुढे म्हणाले, डब्ल्यूएचओच्या मार्गदर्शक तत्वानुसार आवश्यक त्या वैज्ञानिक पद्धतीने कसोटय़ा घेतल्यानंतर हे प्रॉडक्ट कोरोनावरील जगातील सर्वात प्रभावी प्रॉडक्ट ठरले आहे. याबाबतच्या संशोधनाचे पेपरदेखील नामांकित अशा इंटरनॅशनल सायन्स मॅकझिनमध्ये प्रसिद्ध देखील झाले असल्याचे ते म्हणाले. ऍलर्जिक रिऍक्शनबाबत बोलताना ते म्हणाले, वॅक्सीन ही कुठलीही असो, त्यामुळे ऍलर्जिक रिऍक्शन येण्याची काही प्रमाणात शक्यता असते. ती कशाही पद्धतीची असू शकते. क्युअरक्युरेटाबाबत बोलायचे झाल्यास टॅबलेट फॉर्मेटमध्ये असलेल्या या औषधाचे साईड इफेक्ट पूर्णत: झिरो आहेत. याच्या आवश्यक त्या सर्व चाचण्याही पार पडल्या आहेत. वॅक्सीनऐवजी जी रेमिडीसिवीरसारखी काही औषधे या कोरोना वर वापरली गेली, त्याचे साईडइफेक्ट किडन्यांना, लिव्हरला सुज येणे, वजन घटणे, रक्तदाब, शरीरातील साखर वर-खाली होणे, या प्रकरात दिसू लागले आहेत. क्युअरकोव्हिटा हे नैसर्गिक रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे आहे आणि साईड इफेक्ट देखील शून्य आहेत. वैज्ञानिकदृष्टय़ा हे सिद्धदेखील झालंय. या औषधाच्या घेण्यात आलेल्या ऍलर्जिक आणि साईड इफेक्ट चाचण्यांमध्ये असेही दिसून आले की, एकावेळी 280 टॅबलेटस् घेतल्या तरी त्याचा मानवी शरीरावर दुष्परिणाम होत नाही. हे औषध केवळ कोरोनावरच गुणकारी नसून एन्फ्ल्युएन्झा म्हणजेच साथीने पसरणाऱया व्हायरसवर म्हणजेच स्वाईनफ्ल्यू, बर्डफ्लू, हेपीटायटीस ‘सी’, या गंभीर आजारांवरही ते अतिशय गुणकारी ठरले आहे. या औषधांच्या या गुणधर्मांकडे आपल्या देशाने दुर्लक्ष केला असता, तरी युरोपीयन युनियनमधील अनेक देशांनी या ‘क्युअर कोव्हिटा’मध्ये कमालीची उत्सुकता दाखविली आहे व खरेदीसाठी करार करण्याची तयारी सुरू केली असल्याचे डॉ. दौंड यांनी सांगितले.









