वृत्तसंस्था / नवी दिल्ली
शनिवार सकाळ ते रविवार सकाळ या 24 तासांमध्ये देशभरात नव्या कोरोना रुग्णांची संख्या 1,761 असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याच कालावधीत 127 रुग्णांचा मृत्यू झाला. आता देशात उपचाराधीन कोरोना रुग्णांची संख्या 26,240 इतकी उरली आहे. कोरोनाचा तिसरा उद्रेक आता आटोक्यात आला असला तरी आणखी एक वर्षभर मास्क आणि सामाजिक अंतर या दोन नियमांचे पालन करावेच लागणार असल्याचे वैद्यकीय तज्ञांचे मत आहे.
भारतात कोरोनामुळे आतापर्यंत 5,16,479 रुग्णांचा मृत्यू झाला. तर 4,24,65,122 इतके रुग्ण बरे झाले. गेल्या चोवीस तासांमध्ये 4,31,973 चाचण्या घेण्यात आल्या. बरे होण्याचे प्रमाण आता 98.74 टक्क्यांवर पोहचले असून पॉझिटिव्हीटी दर एक टक्क्याच्याही खाली आला आहे.









