अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी मुख्य भूमिकेत
स्वतःच्या होम प्रॉडक्शनचा आगामी चित्रपट ‘खो गए हम कहां’चे चित्रिकरण सुरू झाल्याची घोषणा जोया अख्तरने केली आहे. 49 वर्षीय चित्रपट निर्मातीने स्वतःच्या इन्स्टाग्राम पेजवर सेटवरील क्लॅपरबोर्डचे एक छायाचित्र शेअर करत ‘आम्ही पुढे जात आहोत’ असे म्हटले आहे.

चित्रपटात मुंबईतील तीन मित्रांची कहाणी दर्शविण्यात येणार आहे. याचे दिग्दर्शन अर्जुन वरेन सिंह करत असून त्याने जोया आणि रीमा कागतीसोबत मिळून पटकथा लिहिली आहे. चित्रपटात अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी आणि आदर्श गौरव मुख्य भूमिकेत असणार आहेत.
कॅटरिना कैफने चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा देत हार्टयुक्त इमोजी शेअर केला आहे. शबाना आझमीसह अमिताभ बच्चन यांची कन्या श्वेताने जोया यांच्या पोस्टवर कॉमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. खो गए हम कहां चित्रपटाची निर्मिती फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्या एक्सेल एंटरटेनमेंटसोबत जोया तसेच रीमा कागतीचा बॅनरकडून केली जात आहे. हा चित्रपट पुढील वर्षी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होऊ शकतो.









