नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गुरुवार संध्याकाळ ते शुक्रवार संध्याकाळ या चोवीस तासांमध्ये देशभरात कोरोना रुग्णांची संख्या 2,64,202 ने वाढली आहे. आदल्या दिवशीच्या संख्येपेक्षा ती 6.7 टक्क्यांनी वाढली आहे. ही संख्या गेल्या 239 दिवसांमधील सर्वाधिक आहे. याच कालावधीत 1,09,345 रुग्ण बरे झाल्याने उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 12,72,073 पर्यंत पोहचली आहे. ओमिक्रॉन रुग्णांची संख्या आता 5,753 पर्यंत पोहचली आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या अहवालानुसार भारतात मृतांची संख्या नजीकच्या भविष्यकाळात वाढण्याची शक्यता आहे.
सध्याही नव्या कोरोना रुग्णांमध्ये महाराष्ट्राचीच आघाडी आहे. त्याखालोखाल दिल्लीत रुग्ण सापडत आहेत. तामिळनाडू, पश्चिम बंगाल, राजस्थान, कर्नाटक, उत्तर प्रदेश, गुजरात आदी राज्यांमध्येही रुग्णांची संख्या वाढत आहे.









