वार्ताहर / पाचगाव
केंद्र सरकारने नव्याने केलेल्या कायद्यामुळे शेतकऱ्यांचा तोटा होणार आहे, असे प्रतिपादन शिवसेना करवीर तालुकाप्रमुख विराज पाटील यांनी कंदलगाव येथे आयोजित किसान संघर्ष सभेच्या वेळी केले केले. सभेच्या अध्यक्षस्थानी वसंत कांबळे होते.
मोदी सरकारने शेतकऱ्यांना विरोधी केलेल्या कायद्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. या कायद्यातील त्रुटी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार असल्याचे कॉ. सतीशचंद्र कांबळे यांनी यावेळी सांगितले.
शिवसेना तालुकाप्रमुख विराज पाटील व महाराष्ट्र राज्य किसान सभा सरचिटणीस कॉ .नामदेव गावडे यांनी यावेळी कायद्यातील जाचक अटींबद्दल माहिती सांगितली. गेल्या तीन महिन्यांपासून देशभरातील शेतकरी या कायद्यांना वेगळ्या पद्धतीने विरोध करत आहे. या कायद्याला विरोध म्हणून कंदलगाव येथे बुधवारी किसान सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष कॉ .वाय एन पाटील, कॉ वसंतराव पाटील, कॉ बी के पाटील, कॉ .बाळू पाटील यांच्यासह ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते.









