ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
गूगल आणि फेसबुकनंतर मायक्रोब्लॉगिंग साईट ,’ट्विटर’नेही केंद्र सरकारच्या नव्या आयटी नियमांचे पालन करण्यास सहमती दर्शवली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या नोटीशीनंतर ट्विटरने न्यायालयाला सांगितले की, कंपनीने डिजीटल मीडिया कायदा 2021 चे पालन करत 28 मे रोजी तक्रार अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे. संबंधित अधिकारी स्थानिक तक्रारींच्या निराकरणाचे जबाबदारीने काम करेल.
मात्र, ॲड. अमित आचार्य यांनी आपल्या याचिकेत दावा केलाय की, ट्विटरने नव्या आयटी नियमांचे पालन केले नाही. त्यावर कोर्टाने म्हटलंय की, जर डिजीटल मीडियासंबंधी नव्या आयटी नियमांवर बंदी घातली गेली नाही तर ट्विटरला त्याचे पालन करावे लागेल.









