मुलांच्या जन्मानंतर अनेकींना करीअरमधून ब्रेक घ्यावा लागतो. मात्र काही काळानंतर या महिलांना पुन्हा कामाला सुरूवात करायची असते. मात्र मधल्या काळात आपल्या क्षेत्राशी संपर्क तुटल्याने कुठून आणि कशी सुरूवात करायची याबाबत मनात खूप गोंधळ असतो. बरेच प्रश्न पडलेले असतात. हा गोंधळ दूर करण्यासाठी या टिप्स तुमच्या उपयोगी पडतील.
- मुलं थोडी मोठी झाली असली तरी तुमची जबाबदारी संपलेली नसते. आधीप्रमाणे धावपळ करणं जमतंच असं नाही. त्यामुळे आपले प्राधान्यक्रम ठरवून त्याच्याशी जुळणारी कामं शोधा.
- तुमच्या आवडीचे काही पर्याय सापडल्यानंतर त्यादृष्टीने कौशल्यं विकसित करण्याच्या कामाला लागा. कामाची नेमकी गरज ओळखा. एखादा क्लास लावा. आयटीशी संबंधित नोकरी असेल तर नवं तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी कॉम्प्युटरचा छोटेखानी कोर्स करता येईल.
- तुमचा रेझ्युमे अपडेट करा. तुमची नवी कौशल्यं त्यात नमूद करा. पात्रता, अनुभव, क्षमता, कौशल्यं हे सगळं तुमच्या रेझ्युमेमध्ये स्पष्टपणे लिहायला हवं. यासाठी ऑनलाईन रेझ्युमे मेकर टूल्सचा वापर करता येईल.
- ऑनलाईन जॉब पोर्टल्स, एचआर एजन्सीजच्या माध्यमातून नोकरी शोधा. आपला रेझ्युमे अशा पोर्टल्सवर अपडेट करा. थोडा धीर धरा. विविध कंपन्या तुमच्याशी संपर्क साधतील.
- मुलाखतीला जाण्याआधी भरपूर सराव करा. संवाद कौशल्य वाढवा. आत्मविश्वास उंचवण्याचा प्रयत्न करा.









