प्रतिनिधी / सांगली
जिल्हय़ात शुक्रवारी नवीन सात रूग्ण वाढले आहेत. तर १३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण रूग्णसंख्या २७९ झाली आहे. उपचारातील रूग्णसंख्या १०४ आहे. तर सात जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
मणदूरमध्ये रूग्णांची संख्या वाढतच चालली
जिल्हय़ातील शिराळा तालुक्यातील मणदूर हे गाव कोरोना हॉटस्पॉट बनले आहे. याठिकाणी शुक्रवारी आणखीन चार रूग्ण वाढले. त्यामध्ये ३७ वर्षीय व्यक्ती, ३३ वर्षीय महिला, २७ वर्षीय महिला आणि आठ वर्षाचा मुलगा असे नवीन रूग्ण वाढले आहेत. तर याच तालुक्यातील निगडी येथील ३२ वर्षीय महिला पॉझिटीव्ह आली आहे. पलूस तालुक्यातील आंधळी येथील ४५ वर्षीय व्यक्ती आणि कडेगाव तालुक्यातील अमरापूर येथील ६८ वर्षीय महिला पॉझिटीव्ह आली आहे. या सर्वांवर मिरजेच्या कोरोना रूग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.
शुक्रवारी १३ जण कोरोनामुक्त
जिल्हय़ातील १३ जण शुक्रवारी कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामध्ये पलूस शहरातील सहा व्यक्तींचा समावेश आहे. ४३ वर्षीय व्यक्ती, ५० वर्षीय महिला, २५ वर्षीय व्यक्ती, २५ वर्षीय महिला, २३ वर्षीय युवती आणि २२ वर्षीय युवती हे होय. तसेच शिराळा तालुक्यातील मणदूर येथील चार व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. त्यामध्ये १६ वर्षाची मुलगी, १७ वर्षाची मुलगी, ३८ वर्षीय व्यक्ती, ४० वर्षीय व्यक्ती यांचा समावेश आहे. आटपाडी तालुक्यातील निबंवडे येथील ५८ वर्षीय व्यक्ती, विटा येथील ६७ वर्षीय व्यक्ती, आटपाडी तालुक्यातील विठ्ठलापूर येथील ९६ वर्षीय महिला हे सर्वजण कोरोनामुक्त झाले आहेत. या सर्वांना आता संस्था क्वारंटाईन करण्यात येणार आहे.
अतिदक्षता विभागात सात जणांच्यावर उपचार सुरू
सध्या उपचारात असणाऱया रूग्णांपैकी खानापूर तालुक्यातील साळशिंगे येथील ६० वर्षीय व्यक्ती, कवठेमहांकाळ तालुक्यातील कदमवाडी येथील ५० वर्षीय महिला, विटा-हनुमंतनगर येथील ३४ वर्षीय व्यक्ती, कडेगाव तालुक्यातील वांगी येथील ६९ वर्षीय व्यक्ती, जत तालुक्यातील अंकले येथील ६६ वर्षीय व्यक्ती, शिराळा तालुक्यातील रिळे येथील ७० वर्षीय व्यक्ती आणि मालगाव येथील ७२ वर्षीय महिला अशा सात जणांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
९६ वर्षीय आजीची कोरोनावर मात
जिल्हय़ातील आटपाडी तालुक्यातील विठ्ठलापूर येथील ९६ वर्षीय आजीने शुक्रवारी कोरोनावर मात केली आहे. यापुर्वी वाळवा तालुक्यातील ९४ वर्षीय आजी कोरोनामुक्त झाली होती. त्यामुळे कोरोनावर वेळीच उपचार आणि व्यवस्थित उपचार झाल्यास कोरोनाला मात देता येवू शकते हे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेने पुन्हा एकदा जिल्हय़ातील सर्वात वयोवृध्द व्यक्तीचा कोरोना बरा करून आपली कार्यकुशलता सिध्द करून दाखविली आहे.
कोरोनाची जिल्हय़ातील स्थिती
एकूण रूग्ण २७९
बरे झालेले १६६
उपचारात १०४
मयत ०९








