ऑनलाईन टीम / मुंबई :
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधितांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. प्रकल्पग्रस्तांनी आज आपल्या विविध मागण्यासाठी आंदोलन केले व विमानतळाचे काम बंद पाडले.
प्रकल्पग्रस्तांनी घेतलेल्या या आक्रमक पविर्ग्नयानंतर पोलिसांनी बळाचा करावा लागला. तसेच यावेळी अनेकांना अटकही करण्यात आली.
दरम्यान, वाघीवली येथे प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन सुरू होते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष अनिल पाटील व अखिल भारतीय किसान सभेचे रायगड जिल्हाध्यक्ष रामचंद्र म्हात्रे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले होते. या दोघांनाही यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतले.









