मुंबई \ ऑनलाईन टीम
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ४४व्या वार्षिक महासभेमध्ये रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी अनेक महत्वाचा घोषणा केल्या आहेत. मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी यांनी देखील यावर्षीपासून जिओ इन्स्टिट्यूटविषयी सुरू होणार असल्याची घोषणा केली आहे. या इन्स्टिट्यूटची स्थापना नवी मुंबईमध्ये करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
यावेळी नीता अंबानी म्हणाल्या की, व्यवसायासोबत समाजाला सक्षम बनविणे देखील आमचे काम आहे. कोरोना काळात आम्ही मुलांच्या खेळाशी संबंधित पुढाकार घेतला आहे. आम्ही २.१५ कोटी मुलांपर्यंत पोहोचलो आहोत. देश व समाज मजबूत करण्यासाठी महिला व मुलींना सक्षम बनविणे आवश्यक आहे.तसेच रिलायन्स फाऊंडेशने महत्त्वाच्या ५ मोहिमा सुरू केल्या आहेत. यामध्ये पहिली मिशन ऑक्सिजन, दुसरी – मिशन कोविड इन्फ्रा, तिसरी- मिशन अन्न सेवा, चौथी- मिशन कर्मचारी सेवा आणि पाचवी – मिशन लस सुरक्षा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








