मुंबई
देशातील प्रमुख दुचाकी वाहन निर्माती कंपनी टीव्हीएस मोटर्सने टीव्हीएस झेस्ट 110 या गाडीला नव्या इंजिनसह बाजारात दाखल केले आहे. आकर्षक लुक, दमदार इंजिनसहची बीएस-6 शेणीवर आधारित गाडी 58 हजार 460 रुपयांना (एक्सशोरूम चेन्नई) ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. यापूर्वीच्या बीएस-4 श्रेणीच्या गाडीच्या तुलनेत नव्या गाडीची किंमत मात्र 9 हजार रुपये अधिक असल्याचे कंपनीने म्हटले आहे.









