मुंबई \ ऑनलाईन टीम
नवी मुंबई विमानतळाच्या नामांतरावरुन वाद चांगलाच पेटला आहे. नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याची मागणी स्थानिक प्रकल्पग्रस्त नागरिकांची आहे तर शिवसेनेकडून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी होत आहे. या वादात उडी घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या विमानतळा दि. बा. पाटील किंवा बाळासाहेब ठाकरे यांचं नाव न देता छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्यात यावं, असं मत व्यक्त केलं. दरम्यान नवी मुंबईत दि. बा. पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी आयोजित आंदोलनात मनसे आमदार राजू पाटील सहभागी झाले आहेत .नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी आज सिडकोवर धडक मोर्चा काढण्यात आला आहे.
यावेळी माध्यमांशी बोलताना मनसे आमदार राजू पाटील म्हणाले की, एकीकडे तुम्ही तिसरी लाट येणार सांगत असातना आम्हाला रस्त्यावर उतरायला का लावलं? त्यांना जर फिकीर नसेल तर आम्हालाही नाही. आमच्या मागणीसह आम्ही रस्त्यावर आलो आहोत.
यावेळी राजू पाटील यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेविषयी विचारले असता ते म्हणाले की, जर ते विमानतळ मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तारीत भाग असेल तर त्याला तांत्रिक बाब म्हणून आपोआप शिवरायांचं नाव येणार आहे, ती काही आमची मागणी नाही. नवीन विमानतळ होणार असेल तर दि. बा. पाटील यांचंच नाव दिलं जावं. आम्हाला संघर्ष करायचा नाही तर आमची ताकद दाखवायची असल्याचे त्यांनी सांगितले.
Previous Articleम्हैसूरमध्ये आढळले ‘डेल्टा प्लस’चे चार रुग्ण
Next Article पंजाबमधील कोरोना : सध्या 5,641 रुग्णांवर उपचार सुरु








