सांगली /प्रतिनिधी
नवीन वर्ष सुरू होण्यास आता चार-पाच दिवस राहिले असताना सर्वांनाच नव्या वर्षाचे वेध लागले आहेत. नवीन वर्षा साठी दिनदर्शिका आणि डायऱ्या खरेदीसाठी सांगली बाजारपेठ गर्दी झाली आहे. सांगलीमध्ये पन्नास रुपये पासून ते पाचशे रुपये पर्यंतच्या डायऱ्या विक्रीसाठी आलेल्या आहेत. डायऱ्या बरोबरच नवीन वर्षासाठी बॅनर पॉकेट डायरी ऑफिस कॅलेंडर यांनाही चांगली मागणी असल्याचे येथील पुस्तक विक्रेत्याकडून सांगण्यात आले. डायऱ्या मध्ये रविवारचे पूर्ण पान असणाऱ्या डायऱ्याना अधिक मागणी असल्याचे येथील जीआर ताम्हणकर बुक सेलर्सचे अशोक ताम्हणकर यांनी सांगितले.








