देवगड फिशरमेन्स सोसायटी येथे आयोजन
प्रतिनिधी / देवगड:
नौकांना भारतीय बनावटीच्या मरिन इंजिनच्याव्दारे डिझेल बचत, कमी सेवा खर्च व ट्रकिंग सिस्टीम या गोष्टी एकत्र मिळतात. डिझेलची बचत होऊन जेवढे पैसे मच्छीमारांचे वाचतील, असे मत महिन्द्रा ऍण्ड महिन्द्रा कंपनीचे विभागीय विक्री व्यवस्थापक स्वामी बल्लाळ यांनी व्यक्त केले. देवगड फिशरमेन्स सोसायटीच्या सभागृतहात नवीन मरिन इंजिनबाबत प्रबोधन कार्यक्रमात ते बोलत होते.
देवगड फिशरमेन्स को-ऑपरेटिव्ह सोसायटी व महिन्द्रा ऍण्ड महिन्द्रा कंपनीच्यावतीने देवगड तालुक्यातील मच्छीमारांना नौकांच्या नवीन इंजिन पद्धतीची माहिती देण्यात आली. यावेळी व्यासपीठावर फिशरमेन्स संस्थेचे अध्यक्ष व्दिजकांत कोयंडे, उपाध्यक्ष सचीन कदम, दिर्बा यांत्रिकी नौका मालक संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ कोयंडे, नवनीत मरीन विक्री अधिकारी विकास वेंगुर्लेकर, फिशरमेन्स सोसायटीचे सचीव कमलेश खोत आदी उपस्थित होते. यावेळी मच्छीमारांना मरिन इंजिनच्या नवीन टेक्नॉलॉजीची माहिती देण्यात आली. यावेळी सोसायटीचे अध्यक्ष कोयंडे म्हणाले, नवीन टेक्नॉलॉजीमुळे बोटींचा वेग वाढविता येणार आहे. इतर मरीन इंजिनच्या तुलनेत भारतीय बनावटीच्या इंजिनाचे स्पेअरपार्ट लगेच उपलब्ध होत असल्याने त्याचा मच्छीमारांना फायदा होणार असल्याचे ते म्हणाले. सोसायटीचे सचीव खोत यांनी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेची माहिती दिली.









