जिओला टाकले मागेः ट्रायची माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नवीन ग्राहक जोडण्यामध्ये भारती एअरटेल कंपनीने प्रथमच बाजी मारली आहे. यामध्ये रियालन्स जिओला मागे टाकत हे स्थान पटकावले आहे, अशी माहिती दूरसंचार रेग्युलेटरी प्राधिकरण नियामक (ट्राय) यांच्याकडून देण्यात आली आहे.
चार वर्षांच्या प्रवासामध्ये प्रथमच रिलायन्स जिओ नवीन ग्राहक जोडणीत पाठीमागे पडली आहे. तसेच जिओने सप्टेंबरमध्येही देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी म्हणून नोंद केली होती. रिलायन्स जिओचा प्रारंभ सप्टेंबर 2016 मध्ये झाला होता. तेव्हा कंपनीने 1.59 कोटी नवीन ग्राहक जोडले होते.
एअरटेलने 37.7 लाख नवीन ग्राहक जोडले
उपलब्ध आकडेवारीनुसार सप्टेंबर 2020 मध्ये भारती एअरटेलने जवळपास 37.7 लाख नवीन ग्राहक जोडले आहेत. तसेच रिलायन्स जिओपेक्षा 14.6 लाख नवीन ग्राहक प्राप्त केले आहेत. सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने या कालावधीत 78,454 नवे ग्राहक जोडले आहेत. मात्र दुसरीकडे व्होडाफोन आयडियाने सर्वाधिक ग्राहक गमावले आहेत. चालू महिन्यांमध्ये 46.5 लाख ग्राहकांनी व्होडाफोन आयडियाची साथ सोडली आहे.









