कोरोना विषाणूचा नवा संकरावतार अत्याधिक वेगाने प्रजनन करत आहे. याच्या प्रजननाचा वेग वैज्ञानिकांच्या अनुमानापेक्षाही अधिक आहे. याचमुळे जुन्या विषाणूच्या तुलनेत हा अधिक फैलाव करणारा आहे. ब्रिटनमध्ये झालेल्या एका नव्या अध्ययनानुसार नव्या संकरावतारात जुन्या विषाणूपेक्षा मोठा फरक आहे.
ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या विषाणूच्या प्रजननाचा (रिप्रॉडक्शन) वेग 1.1 ते 1.3 दरम्यान आहे. तर वैज्ञानिक हा वेग 0.6 ते 1.0 राहण्याचा अनुमान व्यक्त करत होते. महामारी सुरू झाल्यापासून आतापर्यंत विषाणूत झालेला हा सर्वात धोकादायक बदल असल्याचे उद्गार लंडनच्या इम्पीरियल कॉलेजचे प्राध्यापक एक्सेल गैंडी यांनी काढले आहेत.

वैज्ञानिक विषाणूच्या प्रजननाला आर नंबर देखील म्हणतात. नोव्हेंबरमध्ये इंग्लंडमध्ये नवा विषाणू तीन पट वेगाने फैलावला, तर जुना विषाणू एक तृतीयांशने कमी झाला आहे. नवा विषाणू 20 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांना संक्रमणाचा शिकार अधिक प्रमाणात करत आहे. जगाला आता अधिक कठोर निर्बंध लादावे लागणार असल्याचा दावा प्राध्यापक जिम नाईस्मिथ यांनी केला आहे.
नजीकच्या भविष्यातही नव्या कोरोना विषाणूचा आर नंबर 1 पेक्षा कमी होणार नाही. यापासून वाचण्यासाठी अधिक कठोर निर्बंध आणि नियम लागू न केल्यास हा मागील विषाणूच्या तुलनेत अनेक पट वेगाने फैलावणार आहे. रुग्णालयांमध्ये नव्या विषाणूचे रुग्ण अधिक दिसून येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.









