नवी दिल्ली
कमी बजेट असणाऱया स्मार्टफोनच्या शोधात असणाऱया ग्राहकांसाठी चांगली बातमी आली असून स्मार्टफोन ब्रँड टेक्नोने आपला सर्वात प्रसिद्ध स्पार्क 8 लेटेस्ट 4 जीबी रॅमच्या मॉडेलसोबत सादर केला आहे. यामध्ये 6.56 इंच डिस्प्ले, 16 मेगापिक्सल एआय डब्बल रिअर कॅमेरा आणि मीडिया टेक हीलियो जी 25 गेमिंग चिपसेट मिळणार आहे.
सदरचा स्मार्टफोन हा भारतीय भाषा सपोर्ट करणार आहे. टेक्नो स्पार्क8 च्या दुसऱया मॉडेलसोबत नवीन मॉडेलला तीन कलरचे पर्यायासह सादर करण्यात आले आहे. दमदार बॅटरी प्राप्त होणार आहे. 8 जीबी 64जीबी मॉडेलची किमत ही 10,999 रुपयापर्यंत राहणार आहे.









