न डरेंगे और न झुकेंगे. 2024 के लिए तैयार रहिए – मलिक
ऑनलाईन टीम / तरुण भारत
अंमलबजावणी संचालनालयाने बुधवारी सकाळी 7 पासुन ते दुपार पर्यंत महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली. यावेळी सुमारे 8 तासांची चौकशी करण्यात आली आहे.जुन्या मालमत्ता व्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांची अंमलबजावणी संचालनालय (ईडी)कडून चौकशी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे या अटकेनंतर राष्ट्रवादीचे नेते मलिक यांची जेजे रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि त्यानंतर पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीदरम्यान ईडीने कोर्टाने नवाब मलिक यांना 8 दिवसांच्या म्हणजेच 3 मार्चपर्यंत ईडी कोठडीवर पाठवले आहे.
अटकेनंतर नवाब मलिक यांनी ट्विट केले आहे कि, ‘न डरेंगे और न झुकेंगे. 2024 के लिए तैयार रहिए.’ तसेच काही वेळाने आणखी एक ट्विट करण्यात आले ”कुछ ही देर की ख़ामोशी है असं ते म्हणालेत.
नवाब मलिक यांच्या अटकेवर महाराष्ट्र सरकारने यावर आक्षेप घेत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. दरम्यान, शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवास्थानी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप पाटील आणि राजेश टोपे तसंच काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण सुद्धा हजर होते. यांनी पुढच्या रणनीतीवर बैठक घेतली. यामध्ये मलिक यांचा राजीनामा न स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. भाजपने ज्या प्रकारे सरकारी तपास यंत्रणाचा वापर केला आहे. त्याला चोख उत्तर देण्याचे आदेश शरद पवार यांनी दिले आहे.
यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे म्हणाल्या, नवाब मलिक यांच्या जागी ईडीचे लोक आले होते. बराच वेळ भाजप कार्यकर्ते, प्रवक्ते ट्विट करत होते की नवाब मलिक यांना ईडीची नोटीस येईल. आज ते पूर्ण झालं. त्या पुढे म्हणाल्या की, भाजप महाविकास आघाडीविरोधात जे षडयंत्र रचत आहे ते संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे.








