इस्लामाबाद
पाकिस्तानातील इस्लामाबाद उच्च न्यायालयाने माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची सुनावणीला सातत्याने अनुपस्थिती पाहता कठोर भूमिका घेत त्यांना गुन्हेगार घोषित केले आहे. या निर्णयाचा अर्थ नवाज हे फरार गुन्हेगार ठरले असून न्यायालयाने याचा उल्लेखही आदेशात केला आहे. नवाज मागील काही महिन्यांपासून लंडनमध्ये वास्तव्यास आहेत. उच्च न्यायालयानेच त्यांना भ्रष्टाचाराच्या दोन प्रकरणी शिक्षा ठोठावली होती. याप्रकरणी पुढील सुनावणी 9 डिसेंबर रोजी होणार आहे. पुढील सुनावणीत मरियम यांच्यावरील आरोपांवर युक्तिवाद होणार आहेत.









