ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता नववी आणि अकरावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच दहावीचा राहिलेला भूगोल आणि कार्यशिक्षणाचाही पेपर रद्द करण्यात आला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
दहावीचा भूगोलाचा शेवटचा पेपर होता. मात्र, कोरोनामुळे देश लॉकडाऊन करण्याची वेळ आल्याने तो पुढे ढकलण्यात आला होता. आता 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आल्यानंतर भूगोलाचा पेपर अखेर रद्द करण्यात आला.









