जीएसटी दरातील फेरबदलांचा परिणाम, जीएसटी 5 टक्क्मयांवरून 12 टक्के- केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
नववर्षात तयार कपडे आणि चपला-बूट यांच्यासह काही निवडक वस्तू महागणार आहेत. 1 जानेवारीपासून नवे जीएसटी दर लागू होणार आहेत. जीएसटीचा दर 5 टक्क्मयांवरून 12 टक्के करण्याबाबतची अधिसूचना केंद्रीय मंत्रालयाने जारी केली आहे. संपूर्ण वस्त्राsद्योग क्षेत्रासाठी दरांमध्ये एकसमानता आणणे आणि वेगवेगळय़ा शुल्क संरचनेमध्ये सुधारणा करणे हा या निर्णयामागील महत्त्वाचा हेतू आहे. आतापर्यंत 1,000 रुपये प्रतिनगापर्यंतच्या विक्री किमतीवर 5 टक्के कर आकारला जात होता. त्याचप्रमाणे फुटवेअरच्या बाबतीत जीएसटीचा दर पुढील वर्षापासून 12 टक्के करण्यात येणार आहे. सध्या 1,000 रुपये प्रतिजोडी विक्री किमतीवर 5 टक्के जीएसटी लागू आहे.
सध्या तयार कपडे तसेच सूत आणि सुती कापड यावर वेगवेगळय़ा दराने जीएसटी आकारला जात आहे. त्यामुळे सुसूत्रता आणण्याचा निर्णय जीएसटी परिषदेच्या बैठकीमध्ये झाला. येत्या 1 जानेवारीपासून याची अंमलबजावणी होणार आहे. तसेच एक हजार रुपयांवरून अधिक किमतीच्या पादत्राणांवरील जीएसटी 5 टक्क्मयांवरून 12 टक्के वाढविण्याची अधिसूचना सरकारने जारी केली आहे. त्यामुळे एक हजार रुपयांपेक्षा अधिक किंमत असलेली पादत्राणेही महाग होणार आहेत. साहजिकच महागाईचा आलेख वाढणार असल्याने संकेत मिळत आहेत.
केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने (सीबीआयसी) विविध प्रकारचे कपडे, पोशाख आणि पादत्राणे यांच्यासाठी वस्तू आणि सेवा कराचा दर 12 टक्के केला आहे. यापूर्वी हा दर 5, 12 आणि 18 टक्के असा वेगवेगळय़ा तीन स्टेजमध्ये आकारला जात होता. काही सिंथेटिक फायबर आणि यार्नसाठी जीएसटी दर 18 टक्क्यांवरून 12 टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. नवीन जीएसटी दर 1 जानेवारी 2022 पासून लागू होईल. ताज्या अधिसूचनेमध्ये पुढील वर्षापासून कोणत्याही मूल्याच्या कपडय़ांवरील जीएसटी दर 12 टक्के असेल असे नमूद केले आहे.
कापड उद्योगात स्पष्टता येण्याचा दावा
जीएसटी दरातील बदलामुळे उद्योगधंद्यांना स्पष्टता येईल आणि उलट शुल्क रचनेमुळे (इनवर्टेड डय़ुटी स्ट्रक्चर) निर्माण झालेल्या समस्या सुटतील, अशी अपेक्षा या क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केली आहे. 1 जानेवारी 2022 पासून वस्त्रोद्योगासाठी प्रस्तावित जीएसटी दर बदलामुळे संपूर्ण मूल्य शृंखलेत 12 टक्के एकसमान कर आकारला जाणार असल्याचे डीलॉइट इंडियाचे वरि÷ संचालक एम. एस. मणी यांनी स्पष्ट केले.
सर्व प्रकारच्या कपडय़ांवर आता 12 टक्के जीएसटी
विणलेले कापड, मानवनिर्मित फिलामेंटचे शिवण धागे, सिंथेटिक फिलामेंट धागे, सिंथेटिक मोनोफिलामेंट, सिंथेटिक फिलामेंट धागा या सर्वांवरील जीएसटी दर 5 वरून 12 टक्के करण्यात आला आहे. तसेच सुतापासून बनविलेले जाळे, दोरी, ब्लँकेट्स आणि ट्रव्हल रग्ज, बेड लिनन्स, टेबल लिनन्स, टॉयलेट लिनन्स आणि किचन लिनन्स, पडदे आणि इंटीरियर ब्लाइंड्स, सॅक आणि सामान पॅकिंगसाठी वापरल्या जाणाऱया बॅग, ताडपत्री आणि सन-ब्लाइंड्सवर देखील 12 टक्के कर आकारला जाईल. त्याचबरोबर तंबू; नौका, सेलबोर्ड किंवा लँडक्राफ्टसाठीचे कापड, कार्पेट, टेपेस्ट्री, भरतकाम केलेले टेबलक्लॉथ किंवा विणलेले फॅब्रिक आणि धाग्याचे सेट; किंवा किरकोळ विक्रीसाठी पॅकिंगमध्ये वापरल्या जाणाऱया तत्सम कापडांच्या विक्रीवरही आता 12 टक्के जीएसटी घेतला जाणार आहे.









