प्रतिनिधी/मुंबई
नवरात्रोत्सव साजरा करताना सर्व नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टिकोनातून योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 7 ते 15 ऑक्टोबर दरम्यान साजरा होणार्या नवरात्रोत्सवाबाबत गफहविभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी, अजूनही कोरोनाचा धोका कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी मोठÎा प्रमाणात एकत्र येऊन गर्दी करून उत्सव साजरा करणे उचित होणार नाही. त्याअनुषंगाने मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.
कोवीड – 19 च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महाराष्ट्र सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत दिलेल्या सुधारीत मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे. नवरात्रोत्सव मंडळांनी महापालिका – स्थानिक प्रशासन यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे, असे गफह विभागाने म्हटले आहे.
यावर्षीचा नवरात्रोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात यावा. सार्वजनिक मंडळांकरीता देवीच्या मूर्तीची उंची 4 फूट व घरगुती देवीच्या मुर्तीची उंची 2 फूटांपर्यंत असावी. मूर्तीचे विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास कृत्रीम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाशी समन्वय ठेवावा, वर्गणी -देणगी स्वेच्छेने दिल्यास स्वीकारण्यात यावी, आरोग्यविषयक व सामाजिक संदेश देणार्या जाहिराती प्रदर्शित करण्यात याव्यात. तसेच ष्माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेबाबत जनजागफती करण्यात यावी. गरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक उपक्रम आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता यांबाबत जनजागफती करण्यात यावी. देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.देवीच्या मंडपांमध्ये आरती, भजन, कीर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही, याची काळजी घेण्यात यावी. मंडपात एकावेळी 5 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती नसावी. देवीच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
दसर्याच्या दिवशी रावण दहनाचा कार्यक्रम हा सर्व नियम पाळून करावा, असेही निर्देश देण्यात आले आहेत.