कळंबा / सागर पाटील
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री कात्यायनी मंदिरातील तयारीला वेग आला आहे. मंदिराच्या गाभाऱ्याची स्वच्छता झाली आहे. उत्सव केवळ दोन दिवसांवर आला असून, नवदुर्गापैकी एक असलेल्या कात्यायनी देवीची कळंब्याजवळील कात्यायनी मंदिरातही नवरात्रौत्सवानिमित्त कोरोनाचे नियम पळत मोजक्याच उपस्थितीत विविध धार्मिक पुजा कार्यक्रम होणार आहेत.
कोरोनामुळे गतवर्षी नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा झाला होता. जागृत देवस्थान असलेल्या कात्यायनीच्या दर्शनासाठी दररोज हजारो भक्तांची गर्दी असते. उत्सवाच्या पहिल्याच दिवशी मंदिर खुले होणार आहे. कात्यानी देवीची नऊ दिवस नऊ वेगवेगळ्या रूपात देवीची पूजा बांधण्यात येणार आहे. कात्यायनी मंदिरात उत्सावा दरम्यान होणाऱ्या गर्दीचे नियोजनाची तयारी बालिंगा उत्सव समितीने केली आहे. या काळात भाविकांनी सोशल डिस्टन्सिंगसह, सॅनिटाईस व मास्क वापरणे निर्देशाचे पालन करणे गरजेचे आहे. करवीर पोलिसांनी ही बंदोबस्ताकरीता अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यात महिलांची सुरक्षिततेबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.