ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पंजाबमध्ये सध्या काँग्रेसमधील अंतर्गत कलहाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. तर, आगामी काळात विधानसभा निवडणुका होणार असल्याने पार्टी हायकमांडून या कलहावर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यातच, समोर आलेल्या माहितीनुसार आता नवज्योत सिंह सिद्धू उद्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. यावेळी काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी देखील उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, मागच्याच आठवड्यात कॅप्टन अमरिंदर सिंह यांना देखील दिल्लीत बोलावले होते. त्यावेळी त्यांची ऑल इंडिया काँगेस कमिटीच्या 3 सदस्यीय समितीसोबत चर्चा झाली होती. सोनिया गांधी यांनी हा वाद मिटवण्यासाठी ही समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये मल्लिकार्जुन खडगे, हरीश रावत आणि जे. पी. अग्रवाल हे सदस्य आहेत. त्यानंतर सिद्धू यांना कधी बोलावले जाईल याकडे सर्वांच लक्ष लागून होते. आता उद्या ही भेट होणार आहे.
या भेटीमध्ये काय चर्चा होणार याकडे आता सर्वांचे लक्ष आहे.