ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
गेले काही दिवस राष्ट्रीय काँग्रेसमध्ये वेगवेगळ्या कारणावरुन अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला असुन यामुळे विरोधी पक्ष ही काँग्रेसवर टीका करताना दिसत आहेत. गेले काही दिवस पंजाब काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद शिगेला पोहोचला होता. या दरम्यान माजी क्रिकेटर आणि राजकारणी नवज्योत सिंग सिद्धू यांनी काही दिवसांपूर्वी पंजाबच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. यावरुन राष्ट्रीय काँग्रेसह राजकीय वर्तुळात तर्क – वितर्क लावले जात होते. यावरुन नवज्योत सिंग सिद्धू यांनी ट्वीट करत आपली भुमिका मांडत आपल्याबद्दलच्या तर्क – वितर्कांना पुर्णविराम दिला आहे.
पंजाबचे नवे मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांनी नव्या मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर करताच सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे पाठवला होता. दरम्यान, सिद्धू यांनी राजीनामा दिल्यावर त्यांच्यावर अनेकांनी टीका केली आहे. याच पार्श्वभूमीवर सिद्धू यांनी शनिवारी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासोबत आपण कायम उभे राहणार आहोत. आपल्या कोणते ही पद असो अथवा नसो. असेही त्यांनी म्हटले आहे. सर्व नकारात्मक शक्तींना मला पराभूत करण्याचा जेवढा प्रयत्न करायचा आहे, तेवढा करू द्या. परंतु सकारात्मक ऊर्जेच्या प्रत्येक छोट्या प्रयत्नाने पंजाब जिंकेल.असेही आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे नवज्योत सिंग सिद्धू यांच्या भुमिकेने इतर पक्षांची वाट ते ही धरणार का ? या प्रश्नाला आता उत्तर ही मिळाले आहे.