खाडीकिनारी दिल होते फेकून, अनैतिक संबंध लपविण्यासाठी महिलेचे कृत्य
प्रतिनिधी/ रत्नागिरी
अनैतिक संबंधातून जन्मलेल्या नवजात अर्भकाच्या खूनप्रकरणी मातेवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तालुक्यातील वरवडे भंडारवाडी येथील खाडीच्या खाजणात 22 डिसेंबर 2019 रोजी स्त्री जातीचे अर्भक मृतावस्थेत आढळून आले होत़े तपासामध्ये या महिलेनेच या अर्भकाला मारल्याचे निष्पन्न झाल्याने तिच्याविरूद्ध आता खूनाचा खटला चालविण्यात येणार आह़े
सुचिता अजित पटेकर (40, ऱा वरवडे खारवीवाडा) असे या महिलेचे नाव आह़े 22 डिसेंबर 2019 रोजी खालचे वरवडे येथील पोलीस पाटील नंदकुमार सिताराम खेडेकर (56) यांनी वरवडे भंडारवाडीत खाडीच्या खाजणीत मृत स्त्री जातीचे अर्भक असल्याची खबर जयगड पोलिसांत दिली होत़ी 24 तासापूर्वी जन्मलेले मृतवस्थेत सापडल्याने परिसरात खळबळ उडाली होत़ी दरम्यान याप्रकरणी जयगड पोलिसात अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होत़ा पोलिसांच्या तपासामध्ये हे अर्भक वरवडे येथील 40 वर्षीय महिलेचे असल्याचे तपासामध्ये समोर आले हेत़े ही महिला विवाहित असून गेल्या अनेक वर्षापासून ती नवऱयापासून वेगळी राहत़े तिचे गावातील तरूणासोबत प्रेमसंबध होत़े त्यातूनच ती गर्भवती राहिली होत़ी मात्र अनैतिक संबंध सर्वांसमोर उघड होतील या भितीने तिने जन्मताच या मुलीचा गळा दाबून खून केल्याचे पोलिसांच्या तपासामध्ये समोर आले आह़े
जयगड पोलिसांनी या महिलेविरूद्ध अर्भकाचा मृत्यू घडण्याच्या उद्देशाने केलेल्या कृतीसाठी भादवि कलम 315 व अर्भकाची विल्हेवाट लावल्याच्या आरोपाखाली भादवि कलम 318 नुसार गुन्हा दाखल केला होत़ा मात्र आता या महिलेनेच आपल्या मुलीचा खून केल्याचे समोर आल्याने भादवि कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आह़े









