वार्ताहर / पंढरपूर
नळी ता.पंढरपूर येथील भीमा नदीपाञातून अवैधरित्या वाळू वाहतुक करणा-या टेम्पोवरती तालुका पोलिसांनी रविवारी कारवाई केली आहे. एक टेम्पो, अर्धा ब्रास वाळू यासह एक लाख २ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला अटक केली आहे.
याबाबब पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार नळी ता.पंढरपूर येथील अहिल्या चौकातून जाणा-या टाटा कंपनीच्या (एम.एम १३ बी. ३५७३) टेम्पोची तपासणी पोलिसांकडून करण्यात आली. यामध्ये अर्धा ब्रास वाळू आढळुन आली.
यामध्ये प्रकाश उर्फ बंडू औदुंबर पांढरे (रा.नळी ता.पंढरपूर जि.सोलापूर) टेम्पो चालकास अटक केली आहे. त्याच्याविरुध्द भा.द.वि.कलम ३७९, सह गौणखनिज कायदा १९७८ चे कलम ४ (१), ४ (क), (१),२१ प्रमाणे तालुका पोलिस ठाण्यात पो.हे.काॅ. अभिजीत ठाणेकर यांनी फिर्याद दिली आहे.
Previous Articleकरमाळा तालुक्यात कोरोना आकडेवारीत घट, नागरिकांत उत्साह
Next Article सांगली जिल्ह्यात नवे 299 तर 795 कोरोनामुक्त









