प्रतिनिधी/ बेळगाव
टिळकवाडी येथील रहिवासी नलिनी केंभावी यांनी पंतप्रधान केअर फंडला 1 लाख रुपयांचा निधी दिला आहे. त्या वयोवृद्ध असल्याने त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत येणे शक्मय नाही. त्यामुळे त्यांनी हा निधी सामाजिक कार्यकर्ते विजय मोरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. याप्रसंगी टिळकवाडी पोलीस स्थानकाचे निरीक्षक श्रीनिवास हंडा व ऍलन मोरे उपस्थित होते. नलिनी केंभावी यांच्यावतीने बुधवार दि. 12 रोजी सकाळी 11 वाजता सदर निधी जिल्हाधिकाऱयांना सुपूर्द करण्यात येणार आहे.









