एकूण 162 विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या खात्यावर जमा झाले
प्रत्येकी 10,546 रुपये, 3 महिन्यांचा कोरोना सर्व्हेचा पगार
महाविद्यालयातर्फे सुहास कदम यांचा केला सत्कार
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
कोरोना व कडक संचारबंदी काळात नर्सिंग कॉलेजमधील विद्यार्थी, विद्यार्थिनीनी आपला स्व:ताचा जीव धोक्यात घालून सोलापूर शहराचा घरोघरी जाऊन यशस्वीपणे कोरोना सर्व्हे केला होता. मात्र, मागील चार महिन्यांपासून वेतन रखडले होते. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सुहास कदम, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नामुळे विद्यार्थ्यांच्या खात्यावर प्रत्येकी दहा हजार रुपये जमा झाल्यामुळे नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी अनोख्या पद्धतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले.
सोलापुरातील भुईकोट किल्ला येथे महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी एकत्र जमून हातामध्ये विविध फलक घेतले होते. धन्यवाद उपमुख्यमंत्री अजित पवार, एकच वादा अजित दादा, विद्यार्थी हितासाठी, साहेबांची राष्ट्रवादी, शासन असावा तर असा अजित दादा, प्रशासनावर पकड असणारा अजित दादा, विद्यार्थी हितासाठी लढणारा सुहासदादा, गरिबांच्या घरची चूल म्हणजे अजितदादा, अशक्य हे शक्य करणारा नेता म्हणजे अजितदादा यासह विविध घोषणाचे फलक विद्यार्थ्यांनी हाती घेतले होते.
सुहास कदम यांनी मानले आभार
नर्सिंग कॉलेजचे 320 विद्यार्थी मित्रांनी यशस्वी कोरोना सर्वे स्वतः चा जीव धोक्यात घालून केला होता, तसेच सर्वच विद्यार्थी मित्रांची घरची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. त्यामुळे त्यांनी 3 महिने जे कार्य केले आहे. त्यांना मानधन मिळावे म्हणून मोर्चा, बैठक, निवेदन, अजितदादा पवार यांची भेट असाच लढा उभा केला आज ते स्वप्न साकार झाले त्याचा आनंद मला मिळाला आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,महानगरपालिका आयुक्त पी शिवशंकर, उपायुक्त धनराज पांडे यांचे आभार.









