बँक घोटाळ्याशी संबंधित प्रकरण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने (सीबीआय) शुक्रवारी 538 कोटींच्या बँक घोटाळ्याप्रकरणी अनेक ठिकाणी छापे टाकले. यामध्ये जेट एअरवेजचे माजी प्रवर्तक नरेश गोयल यांच्या ठिकाणांवरही छापे टाकण्यात आले आहेत. सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेट एअरवेजच्या अनेक माजी संचालकांसह इतर अनेक संशयितांवर छापे टाकण्यात आले. दिल्ली आणि मुंबईतील जेट एअरवेजच्या मालमत्तांसह एअरवेजचे माजी अधिकारी आणि गोयल यांच्यावर छापे टाकण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. बँकेच्या फसवणुकीबाबत यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या छाप्यात सीबीआयने नरेश गोयल आणि त्यांची पत्नी अनिता यांच्यासह माजी विमान कंपनीचे संचालक गौरांग आनंद शेट्टी यांच्या निवासस्थानांवर आणि कार्यालयांवर छापे टाकले. जेट एअरवेजने पॅनरा बँकेकडून सुमारे 538 कोटींचे कर्ज घेतले होते. याबाबत काही सरकारी कर्मचाऱ्यांसह इतरांवरही कारवाई होऊ शकते.









