जुलैच्या पहिल्या आठवडय़ापासून होणार प्रारंभ
प्रतिनिधी/ बेळगाव
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण उद्योग खात्री योजनेतील कामगारांच्या आरोग्य तपासणीसाठी जिल्हा पंचायतच्यावतीने विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. बेळगाव जिल्हय़ातील सर्व 506 ग्राम पंचायतीच्या कार्यक्षेत्रात नरेगा अंतर्गत सुरू असणाऱया कामाच्या ठिकाणी जाऊन कामगार वर्गाची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद के. व्ही. यांनी दिली आहे. सध्या कोरोनामुळे कामगार वर्गानेही खबरदारी घेणे गरजेचे आहे. मात्र जिल्हय़ातील अनेक ठिकाणी नरेगा अंतर्गत सुरू असणाऱया कामाच्या ठिकाणी असंख्य कामगार एकाच ठिकाणी कामास असल्याने त्यांची आरोग्य तपासणी होणे गरजेचे बनले असल्याचे डॉ. राजेंद्र के. व्ही. यांनी सांगितले आहे.
आतापर्यंत नरेगा अंतर्गत बेळगाव जिल्हय़ात 6.5 लाख जॉबकार्ड देण्यात आले आहेत. दररोज 86 हजार ते 1 लाखापर्यंत कामगार कामे करत आहेत. या सर्वांची आरोग्य तपासणी करण्याची ही योजना आहे. कोणतीही आरोग्य समस्या असल्यास मोफत चिकित्सा करण्याचा उद्देशही योजनेचा आहे. याबरोबरच कामाच्या ठिकाणी जाऊन कामगार वर्गात आरोग्य जागृती निर्माण करण्याचे कामही या योजनेद्वारे होणार आहे. जिल्हय़ातील प्रत्येक तालुक्मयांमध्ये दोन डॉक्टरांचा समावेश असणाऱया 6 ते 7 जणांच्या पथकांची यासाठी नियुक्ती करण्यात येणार आहे. 15 दिवसांपर्यंत जिल्हय़ात हे अभियान सुरू राहणार आहे. एखाद्यावेळेस कामगारास गंभीर आजार असल्यास त्यांच्यावर जिल्हा इस्पितळात उपचार करण्यात येणार आहेत. अशी माहिती जि. पं. सीईओ डॉ. राजेंद्र के. व्ही. यांनी यावेळी दिली.
कामाच्या ठिकाणी अभियानास होणार प्रारंभ
जुलैच्या पहिल्या आठवडय़ापासून जिल्हय़ातील नरेगाअंतर्गत सुरू असणाऱया कामाच्या ठिकाणी या अभियानाचा प्रारंभ होणार आहे. या विशेष अभियानात महिलांच्या गर्भकोष, कर्करोग तसेच अन्य आजारांचीही मोफत तपासणी होणार आहे. श्रमिक वर्ग आपल्या आरोग्याकडे म्हणावे तसे लक्ष देत नसतो. सध्या कोविड 19 मुळे आरोग्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. बऱयाच वेळा नरेगा कामाच्या ठिकाणी सामाजिक अंतर ठेवण्यात येत नसून याकडेही गांभीर्याने लक्ष देण्यात येणार आहे. त्यामुळेच हे विशेष अभियान राबविण्यात येणार असून, यामुळे कामगार वर्गाला अनुकुल ठरणार आहे. तसेच गंभीर आजार असल्यास प्राथमिक स्तरावरच उपचार देण्यात येणार असल्याने भविष्यातील धोका टाळण्यास मदत मिळणार असल्याचे सीईओ डॉ. राजेंद्र के. व्ही. यांनी सांगितले आहे.









