ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :
नरेंद्र मोदी देशात फूट पाडत आहेत, असा आरोप काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी केला आहे. सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज विरोधी पक्ष नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी यांनी सरकारवर हल्ला चढवला आहे.
ते म्हणाले, नरेंद्र मोदी हे देशातील युवकांच्या प्रश्नावर न बोलता दिशाभूल करत करत आहेत. त्यांनी युवकांचा न्याय आवाज दडपण्यापेक्षा तो ऐकला पाहिजे असे वक्तव्य केले.
आपली अर्थव्यवस्था का उद्ध्वस्त होत आहे हे हिंमत करून युवकांना सांगितले पाहिजे. मात्र, सरकार मार्ग दाखवण्यात अपयशी ठरत आहे. हिंम्मत असेल तर मोदींनी पोलीस सुरक्षेशिवाय विद्यार्थ्यांसमोर उभे राहण्याची हिंमत दाखवावी. तसेच ते देशाबरोबर काय करणार आहेत हे सांगाव. असंही राहुल गांधी यांनी म्हटले.









