प्रतिनिधी /सांगली
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे नेतृत्व करणारे नरवीर बहिर्जी नाईक यांच्या बाणुरगड (ता. खानापूर, जि. सांगली) येथील समाधीस्थळ परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्याचा निर्णयसरकारने घेतला आहे. या अनुषंगाने लवकरच बैठक घेऊन सविस्तर नियोजन करण्यात येईल, असे राज्याचे पर्यटन मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
खानापूर आटपाडीचे आमदार अनिलभाऊ बाबर यांनी बुधवारी मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन यासंदर्भातील निवेदन त्यांना सादर केले. त्याची तातडीने दखल घेऊन बाणुरगड येथील समाधीस्थळ परिसराचा पर्यटनदृष्ट्या सर्वांगिण विकास केला जाईल, त्या साठी बैठक घेतली जाईल असे मंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले
Previous Articleचला, राष्ट्र निर्माणात सर्वांनी सहभाग घेऊया
Next Article जॅकोब मॅथ्यू अन् त्यांचे गोव्यातील शैक्षणिक कार्य








