प्रतिनिधी / सरवडे
नरतवडे ता.राधानगरी येथील २४ वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाली आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या ५ जणांना होम क्वॉरन्टाईन करण्यात आले आहे. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
नरतवडे येथील एक युवक चार दिवसापूर्वी मुंबईहून थेट राधानगरी कोव्हीड सेंटर येथे दाखल झाला. चार दिवसापूर्वी घेतलेल्या स्वॅबचा आज रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्याला राधानगरी कोव्हीड सेंटर मध्येच ठेवण्यात आले. परंतु त्याच्या संपर्कात गावातील ५ जण आल्यामुळे त्यांना ग्रामदक्षता समिती व आरोग्य विभागाने होम क्वॉरन्टाईन करण्यात केले आहे. या रुग्णांच्या संपर्कात अजून कोणी आले आहे का याचाही शोध सुरू आहे. यामुळे गावात भितीचे वातावरण पसरले आहे.
Previous Articleशिरोळ पंचायत समिती सभापती मिनाज जमादार यांचा राजीनामा
Next Article पुणे विभागातील 32,634 रुग्ण कोरोनामुक्त!








