जगभरात चित्रविचित्रत दावे करण्यात येणाऱया अनेक जागा आहेत. अशीच एक जागा तुर्कस्तानमधील प्राचीन शहर हिरापोलीस शहरात आहे. येथे एक प्राचीन मंदिर असून ते नरकाचे द्वार असल्याचा दावा करण्यात येतो. या मंदिराजवळ जाणाऱयाचा मृत्यू होतो आणि या मंदिरात कुणी प्रवेश केला तर त्याचे शरीरा सापडत नसल्याचे बोलले जाते.
या जागेला ‘नरकाचे द्वार’ म्हटले जाते, कारण मागील काही वर्षांपासून तेथे गूढ मृत्यू होत आहेत. या मंदिराच्या संपर्कात येणारा कुठलाही प्राणी मृत्यू पावतो. ग्रीक देवाच्या विषारी श्वासाने या मंदिराच्या संपर्कात येणारे सर्व प्राणी मृत्युमुखी पडतात अशी येथील लोकांची श्रद्धा आहे. ग्रीको-रोमन काळात मंदिरात प्रवेश करणाऱया प्रत्येकाचा शिरच्छेद केला जात होता.
इथे सतत होणाऱया मृत्यूंमुळे लोक या मंदिराला ‘द गेट ऑफ हेल’ म्हणतात. ग्रीक आणि रोमन काळातही लोक या मंदिरात जाण्यास घाबरत होते. या मंदिराजवळ लोकांच्या रहस्यमय मृत्यूचे गूढ वैज्ञानिकांनी सोडविले आहे. मंदिराखालून विषारी कार्बन डायऑक्साइड वायू बाहेर पडत असतो, त्याच्या संपर्कात येताच माणूस, प्राणी, पक्षी यांचा मृत्यू होत असल्याचे शास्त्रज्ञांचे सांगणे आहे.
शास्त्रज्ञांना मंदिराखालील गुहेत मोठय़ा प्रमाणावर कार्बन डायऑक्साइड आढळून आला. साधारणपणे केवळ 10 टक्के कार्बन डायऑक्साइड 30 मिनिटात एखाद्या व्यक्तीचा जीव घेऊ शकते. परंतु मंदिराच्या गुहेत विषारी वायूचे प्रमाण 91 टक्के आहे.









