नरंदे/वार्ताहर
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नरंदे येथील ग्रामदैवत नागनाथ देवाची यात्रा मोठ्या प्रमाणात साजरी केली जात आहे. नरंदे येथील ग्रामदैवत नागनाथ यांची यात्रा महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखली जाते. यात्रेनिमित्त घेण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. आज, शनिवारी नागनाथ यात्रेनिमित्त दैनिक तरुण भारत मध्ये नरंदे यात्रा या विशेष पुरवणीचे प्रकाशन नरंदे येथील कुस्ती मैदानात करण्यात आले. यात्रेचा कालावधी हा पाच दिवसात असतो. पहिल्या दिवशी मानाच्या झाली, दुसऱ्या दिवशी हाडकी, यात्रा तिसऱ्या दिवशी भर यात्रा व चौथ्या दिवशी गावात गाव यात्रा असते.
यावेळी नरंदे गावचे लोकनियुक्त सरपंच रवींद्र अनुसे, उपसरपंच अभिजित भंडारी, शरद कारखान्याचे संचालक बबनराव भंडारी, कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष नामदेवराव मोहिते, ग्रामपंचायत सदस्य विनोद भंडारी, संतोष भंडारी, भाऊसाहेब शेटे सचिन भंडारी, कपिल भंडारी, नामदेव पाटील, मानसिंगराव देशमुख, हर्षवर्धन देशमुख, संदीप भंडारी, प्रकाश भंडारी, ग्रामसेवक राजेंद्र भोपळे, महावीर चौगुले, शरद कारखाना संचालक डी. बी. पिष्टे, रावसाहेब चौगुले, राजू खरोशे, पतंगराव भंडारी, संदीप भंडारी, आनंदा खोत बाळासो भंडारी, बाजीराव पाटील, यासह मान्यवर उपस्थित होते.









