प्रतिनिधी / नरंदे
नरंदे तालुका हातकणंगले येथील दोन व्यक्तींचा कोरोना अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आला आहे. यातील एक महिला व पुरुष यांचा समावेश आहे. मिरज येथील शासकीय रुग्णालयात त्यांनी कोरोना ची टेस्ट केली होती या दोघांचीही अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आला आहे. कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींचे रहिवासी क्षेत्र प्रतिबंधित करण्यात आला असून आले. त्यांच्या थेट संपर्कातील वीस जणांना संस्थात्मक विलगिकरणासाठी अतिग्रे येथील संजय घोडावत युनिव्हर्सिटीच्या कोव्हिड केअर सेंटर मध्ये आरोग्य विभागामार्फत पाठवण्यात आले आहे. कोव्हिड पॉझिटिव्ह व्यक्तींच्या रहिवासी क्षेत्रात संपूर्ण सॅनिटरायजेशन करण्यात आले असून नरंदेत सलग तीन दिवस अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले आहे.
गावातील प्रत्येक नागरिकांनी घरातच राहून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन ग्रामपंचायत नरंदे, कोरोना दक्षता कमिटी, आरोग्य विभागामार्फत केले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









