प्रतिनिधी / नरंदे
नरंदे तालुका हातकणंगले येथील शुक्रवारी दोन व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्या व्यक्तीच्या थेट संपर्कातील व्यक्तींना अतिग्रे येथील संजय घोडावत कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल केले होते.
दाखल केलेल्या व्यक्तीची स्वॅब तपासणी कोल्हापूर येथे केली होती. तपासणी केलेल्या व्यक्तींपैकी सात जणांचा अहवाल आज सायंकाळी पॉझिटिव्ह आला आहे. त्यापैकी नरंदे येथील ६जण व बुवाचे वाठार येथील एक व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून ६ जणांचा अवहाल निगेटिव्ह आला आहे. अजून काही व्यक्तीचा अवहाल येणे बाकी आहे.
Previous Articleशिरोळमधुन एक विवाहिता वय १९ वर्षाच्या तरुणी बेपत्ता
Next Article कोयना परिसराला भूकंपाचे सौम्य धक्के








