दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नयनताराने अलिकडेच दिग्दर्शक विग्नेश शिवनसोबत साखरपुडा केला आहे. सोशल मीडियावर नयनताराची विग्नेशसोबतची छायाचित्रे व्हायरल होत आहेत. नयनतारा डेस्टिनेशन वेडिंगची योजना आखत असल्याचे समजते. दोघेही लवकरच विवाहाची तारीख जाहीर करणार आहेत. नयनतारा आणि विग्नेश मागील 5 वर्षांपासून डेटिंग करत आहेत.
दोघेही 2015 मध्ये नानुम रावडी धान या चित्रपटाच्या सेटवर भेटले होते. दीर्घकाळापर्यंत परस्परांना समजून घेतल्यावर दोघांनी जीवनभरासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. विग्नेशपूर्वी नयनतारा दीर्घकाळापर्यंत प्रभूदेवाच्या पेमात आकंठ बुडाली होती. नयनतारासोबत विवाह करण्यासाठी प्रभुदेवाने स्वतःच्या पत्नीला घटस्फोटही दिला होता. पण पुढील काळात नयनतारा आणि प्रभूदेवा वेगळे झाले.









