- कपिल झाला दुसऱ्यांदा ‘बाबा’
ऑनलाईन टीम / मुंबई :
कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्माच्या घरी आणखी एका छोट्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. कपिल आणि गिन्नी यांना आज सकाळीच पुत्ररत्न प्राप्त झाल्याची माहिती स्वतः कपिल याने ट्विट करत दिली आहे.

कपिलने बाळ आणि बाळाची आई दोघांचीही तब्येत सुखरुप असल्याचे ट्वीटमध्ये म्हटले आहे. तसेच सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा आणि आशीर्वादाचे स्वागत देखील केले आहे.
दरम्यान, कपिल शर्मा याला एक मुलगी देखील आहे. तिचे नाव अनायरा असे आहे काही दिवसांपूर्वी अनायराच्या वाढदिवसाचे फोटो कपिलने सोशल मीडियावर शेअर केले होते.
द कपिल शर्मा शोच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला प्रसिद्ध कॉमेडियन अभिनेता कपिल शर्मा आता लवकरच एका वेब सीरिजमध्ये दिसणार आहे.









